Breaking News

पर्यटन, सांस्कृतिक, कला महोत्सवाला पोपटराव पवार यांची भेट

अहमदनगर, दि. 30 - महाराष्ट्र शासन उपक्रम पर्यटन, सांस्कृतिक कार्यविभाग जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव  समितीच्या वतीने आयोजित पर्यटन, सांस्कृतिक, कला महोत्सवाला महाराष्ट्र निर्मल ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी भेट दिली. आचार्य  आनंदऋषीजी म.सा. यांच्या 25 व्या रजत पुण्यस्मृतीदिनानिमित्त चिंचवड (जि.पुणे) येथून आलेल्या भाविकांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच  महोत्सवात विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
महोत्सवा निमित्त महावीर कलादालन येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाची पोपटराव पवार यांनी पहाणी करुन, शहरातील पर्यटन, सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन  देण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता असल्याचे विचार प्रकट केले. वैचारिक प्रगल्भता निर्माण होण्यासाठी वाचनाची आवश्यकता असल्याचे सांगून, घेण्यात  आलेला उपक्रम त्यांनी कौतुक केले.