Breaking News

सातवा वेतन लागू होण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांचे धरणे

 अहमदनगर, दि. 30 - ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन त्वरीत लागू करण्याच्या मागणीसाठी आखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना जिल्हा शाखेच्या  वतीने मुख्य डाक अधिक्षक कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कॉ.ए.एस. पवार, सचिव एन.बी. जहागीरदार,  विजयकुमार एरंडे, प्रदीप वरुडे, लिंबाजी गायकवाड, अनिल शिंदे, बादशाह सय्यद, गंगाधर ढुमणे, लक्ष्मण बर्डे, बी.बी. कोहक, रत्नमाला टेके, कल्पना घोडे,  आजीनाथ सोले, बाळासाहेब जगदाळे, गौतम मते, रेव्हनाथ काकडे, गणेश थोरवे, राजमोहंमद शेख, संजय वायाळ, रावसाहेब वाहुरवाघ, भास्कर दरंदले आदिंसह  मोठ्या संख्येने ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते.
 नुकतेच दि.26 व 27 जानेवारी रोजी कारुर (तामीलनाडू) येथे केंद्रीय कार्यकारणीची बैठक झाली. बैठकिला महाराष्ट्राचे सक्रल सेक्रेटरी पी.एच. जयस्वाल  उपस्थित होते. बैठकित सातव्या वेतन आयोगाचे डॉ.कमलेशचंद्र कमिटीने सरकारला सादर केलेल्या शिफारसीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण  डाकसेवक कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारसी डाकखात्याने त्वरीत लागू करण्याचे सुचित करण्यात आले. यामध्ये कमी वेतनात वाढ, पेन्शन व ग्रॅज्युएटी या  संदर्भात महत्त्वाचे बदल सुचविण्यात आले. कंबाईन्ड ड्युटी अलाउन्स बंद करुन, सर्व सुट्टीच्या काळातील बदली कर्मचारी जीडीएसच्या जबाबदारीवर लावण्यास  परवानगी देण्याची व कामाच्या मापणाची जुनीच पध्दत चालू ठेवण्याची मागणी अंतर्भुत करण्यात आली आहे. संघटनेने सुचवलेले वरील बदलाची त्वरीत  अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मागणीचे निवेदन वरिष्ठ डाक अधिक्षक ए.व्ही. गायकवाड यांना देण्यात आले.