Breaking News

बबनबाईला अजुनही मिळेना शासकीय मदत.विजेच्या धक्याने गमावला उच्चशिक्षित मुलगा.


प्रतिनिधी/पाथर्डी/- विजेचा धक्का बसल्याने आपला कर्ता मुलगा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गमवल्याने बबनबाई अनेक दिवसापासुन शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यातील मोहटा येथील गेल्या चार महिन्यापुर्वी उच्च शिक्षित तरुण हरिदास सतुबा दहिफळे याचा महवितरणाच्या हलगर्जीपणामुळे विजेचा झटका बसुन मुत्यु झाला होता. हरिदास हा आपल्याच शेतामधे शेळ्या चारण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली होती .महवितरणच्या तारेच्या पोल मध्ये विजप्रवाह उतरल्याने त्याचा घटनास्थळीच मुत्यु झाला होता.

हा वीज महावितरण महामंडाळाचा हलगर्जीपणा असल्याचा अहवाल उप कार्यकारी अभियंता अहमदनगर यांनी दिला होता .सदर अपघाताच्या आर्थिक भरपाईची जबाबदारी ही महाराष्ट राज्य वि.वि.कं.यांचीच राहील, असा अभिप्राय त्यांनी दिला आहे.मात्र अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही असे बबनबाई यांनी सांगितले.त्यांनी अनेकवेळा कार्यालयाचे उंबरठे झीजवले , मात्र कोणीही त्यांची दखल घ्यायला तयार नाही.उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मदतीचा अर्जाद्वारे मागणी केली

त्यांच्या पत्राची वाट त्या अजुनही पहात बसल्या आहेत. अपघाती निधन झाले की, लगेच मदत मिळते मात्र चार महिने उलटली अजुन ही त्यांच्या पर्यंत काहीच आले नाही.असे त्या दुःखाने सागतांत.बबनबाई यांना दोन मुल आहेत.त्यांच्याकडे थोडी फार शेती आहे.हरिदास हा लहान मुलगा होता. एक मुलगा शेती करतो, तर दुसरा मुलगा आपला नोकरीला लागला पाहिजे. म्हणुन बबनबाई यांनी कष्ट करून त्याला शिकवले हरिदास यांने इंजिनिअरिंग करुन उच्च शिंक्षण घेतले होते.

महवितरण मध्येच परिक्षा देऊन कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा दिली होती.तो नक्की पास होईल, अशी त्याला खात्री होती.मात्र ते नियतीला मान्य नव्हते त्यांच्यावर काळाने घाला घातला.नोकरीला लागुन आईचे कष्ट थांबले पाहिजे असे त्याचे स्वप्न होते.मात्र ते अधुरे राहीले ज्या खात्यात त्याला नाकरी करायची संधी मिळणार होती. त्याच खात्याच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा मुत्यु झाल्याने बबनबाई अत्यंत व्यथीत होऊन सांगतात.

पाथर्डी कार्यालय ते नगर,नाशिक,मुंबई व थेट मंत्र्यापर्यंत मदत मिळण्यासाठी पाठपुरवा केला.मात्र आपल्याला मदत कधी मिळणार याच उत्तर अजुन ही कोणी अधिकारी देऊ शकलेला नाही.बबनबाई यांची परिस्थीती अत्यंत बिकट आहे.दगड मातीचे घर आहे.शेतीत मोल मजुरी करुन त्या आपले कुटुंब चालवतात.शासनाची मदत कधी मिळेल असे त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना त्यांनी सवाल केला.आता फक्त त्यांना प्रतीक्षा आहे मदतीची