Breaking News

सहकार्य करता आले नाही तरी चालेल विरोध करू नका- लाहोटी

लातूर (प्रतिनिधी), दि. 29 - सामाजीक काम उभे राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य लागते, अशा कामांमध्ये सहकार्य करता आले नाही तरी चालेल, किमान विरोध तरी करू नका असे मत दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी व्यक्त केले. 
येथील लाहोटी कम्पाऊंडमध्ये लातूर जिल्हा माहेश्‍वरी सभेच्या नियोजीत कार्यालयाच्या भूमिपुजन प्रसंगी लाहोटी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी चिरंजीलाल दागडीया हे होते.  यावेळी श्रीकिशन भन्साळी, हुकूमचंद्र कलंत्री, राजकुमार पल्लोड, सत्यनारायण हेड्डा, बालकिशन मुंदडा, प्रकाश कासट यांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रात काम करण्याची परंपरा लाहोटी परिवाराची आहे. ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत असून अशा कामात ख्वाडा घालू नये असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी बनवल्या सामाजिक संदेश देणार्‍या गुढ्या
लातूर: येथील सौ. केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येस सामाजिक संदेशाच्या माध्यमातून जनजागृती करणार्‍या आकर्षक गुढ्या बनवल्या. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या गुढ्या बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांचे मार्गदर्शन लाभले .
 आपल्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या तसेच      ‘लेक वाचवा  लेक शिकवा’ चा संदेश वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याच्या उद्देशाने  सौ. कल्पना भट्टड यांनी गुढी पाडव्याच्या अनुषंगाने हा अभिनव उपक्रम राबवला. या विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा- झाडे जगवा’, जल है तो कल  है, पाणी वाचवा- पाणी आडवा असे प्रबोधनात्मक संदेश देणार्‍या आकर्षक गुढ्या तयार केल्या. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सर्वांचे लक्ष वेधून गेला. या अभिनव उपक्रमाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल,  मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता रणदिवे यांनी वर्गशिक्षिका सौ. कल्पना भट्टड व सर्व विद्यार्थांचे कौतुक केले आहे.