मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा 10 हजार कोटीने कमी?
मुंबई , दि. 29 - आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई मनपाचा अर्थसंकल्प आज (29 मार्च) सादर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प आज स्थायी समिती बैठकीत सादर होईल.
दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटीने कमी असण्याचा अंदाज आहे.
2016-17 या वर्षात 37 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आतापर्यंत अर्थसंकल्पाचा आकडा वाढला आहे, पण कमी झालेला नाही. अनेक प्रकल्पाच्या आडून घेतलेले कर्ज आदी बाबी यात दाखवले जात असल्याने दरवर्षी फुगवलेला अर्थसंकल्पच सादर होत होता.
हा प्रकार यंदाच्या अर्थसंकल्पापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा सुमारे दहा हजार कोटी कमी करुन सादर केला जाणार आहे. परिणामी सुमारे 30 हजार कोटीचा फुगीर नसलेला अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.