साबांः मध्य मुंबईला लावला शेकडो कोटींचा चुना पाटील सोबत जवंजाळांच्या सहभागाच्या खुणा
मध्य मुंबई साबां मंडळात तब्बल 135 कोटींचा नवा घोटाळा उघडकीस आला आहे.या घोटाळ्यात कार्यकारी अभियंताए.जे.पाटील यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याची चर्चा आहे,अधिक्षक अभियंता राजेंद्र जवंजाळ यांचाही यात सहभाग असावा अशी शंका प्रथम दर्शनी व्यक्त केली जात आहे.
दि. 30, मार्च - सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचारी प्रवृत्तींचा सुंभ जळाला असे वाटत असतानाच मध्य मुंबई सांबा मंडळाचे कार्यकारी अभियंता ए.जे.पाटील यांचा दोन वेगवेगळ्या प्रकरणातील तब्बल 135 कोटींचा गैरप्रकार चव्हाट्यावर आल्याने भ्रष्टाचाराचे पीळ माञ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.30 एप्रिल 2017 या दिवशी कार्यकारी अभियंता ए.जे.पाटील हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सेवेतून निवृत्त होत असतांना भ्रष्टाचाराचे हे प्रकरण उघड झाल्याने त्याचे गांभिर्य वेगळ्या अर्थाने वाढले आहे.अधिक्षअभियंता राजेंद्र जवंजाळ यांचा या एकुणच भ्रष्टाचाराच्या पाटीलकीत किती सहभाग आहे आणि या सहभागाची जवंजाळ यांनी किती बोली लावली हा मुद्दा देखील औचित्याचा ठरला आहे.मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले ए.जे.पाटील हे मुळतः पुर्वाश्रमीच्या धवड देबडवार पाटील सुर्यवंशी या लाबीचे सक्रीय सदस्य म्हणून साबांत सुपरीचीत आहेत.म्हणजेच साबांतील भ्रष्टाचाराची मोडस आपरेंडी ए.जे.ना पक्की ठाऊक आहे हेच या ताज्या प्रकरणाने सिध्द केले आहे.हे प्रकरण पाटील यांनी आपल्या खास शैलीत दडपलेही असते,सन्मानाने निवृत्तीचा सत्कारही स्वीकाराला असता माञ या घोटाळ्याचे पाणी मुरण्याची मर्यादा संपली आणि पडद्याआड ठेवलेले प्रकरण साबांच्या पाञातून ओसंडून वाहू लागले.आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात रूतून राहण्यात अनेक सहकारी अभियंत्यांनी स्वारस्य नसल्याचे आपल्या कृतीतून दाखविण्यास सुरूवात केली.पाटील यांच्याशी असहकार पुकारून मध्य मुंबई साबां मंडळात पाटील यांनी केलेली अनियमितता मान्य नाही हे आधीच स्पष्ट केले आहे.राहीला प्रश्न अधिक्षक अभियंता राजेंद्र जवंजाळ यांचा.कार्यकारी अभियंत्यांच्या प्रत्येक कार्यालयीन भुमिकेला अधिक्षक अभियंता हे जबाबदार असतात किंबहूना अधिक्षक अभियंता यांच्या संमतीशिवाय कार्यकारी अभियंता काम करण्यास धजावत नाहीत,या न्यायाने मध्य मुंबई साबां मंडळात सुरू असलेल्या अनियमिततेच्या पाटीलकी संदर्भात अधिक्षक अभियंता राजेंद्र जवंजाळ अनभिज्ञ आहेत असे मानने विनोद मिश्रीत धाडस ठरेल,अशी साबांत सुरू आहे. हेच वेगळ्या आणि स्पष्ट भाषेत सांगायचे तर पाटील यांच्या कार्यप्रणाली विषयी राजेंद्र जवंजाळ हे पुर्ण परीचीत आहेत,यावरून त्यांचा सहभाग स्पष्ट होतो.