भारतीयांची, विशेषत : कोहलीची माफी मागतो : ब्रॅड हॉज
मुंबर्ई, दि. 30 - शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताचा सलामीवीर मुरली विजयची माफी मागितली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजलाही उपरती झाली आहे. विराट कोहलीच्या दुखापतीवरुन नको ते अंदाज लावून, उतावीळपणे प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी हॉजने माफी मागितली आहे.
विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. मात्र कोहलीने आयपीएलसाठी कसोटीतून माघार घेतली, असा अजब दावा ब्रॅड हॉजने केला होता. त्याप्रकरणी हॉजने माफी मागितली आहे.
देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरणं हा कोणत्याही खेळाडूचा सन्मान असतो. मात्र मी केलेल्या वक्तव्यामुळे, मी तमाम भारतीयांची, क्रिकेटप्रेमींची आणि विशेषत: विराट कोहलीची माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा, टीका करण्याचा किंवा कुणाची मानहानी करण्याचा माझा हेतू नव्हता. हलक्या विनोदाच्या उद्देशाने मी तसं म्हणालो होतो.