2004 मधील लांब उडीसाठी अंजूला ऑलिम्पिक पदक मिळणार?
मुंबई, दि. 30 - 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये उत्तेजक सेवनाची लबाडी करून, रशियन अॅथलिट्सनी लांब उडीची तिन्ही पदकं लाटली असा आरोप भारताची लांब उडीतली अॅथलीट अंजू जॉर्जनं केला आहे. त्यापैकी रौप्यपदकाचा मान हा आपला असल्याचा दावा अंजू जॉर्जनं केला आहे. अथेन्स ऑलिम्पिकमधल्या महिलांच्या लांब उडीत अंजू पाचव्या स्थानावर आली होती. ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉनवीन थॉम्पसननं चौथं, तर ब्रिटनच्या जेड जॉन्सननं सहावं स्थान पटकावलं होतं.
अथेन्स ऑलिम्पिकमध्ये लांब उडीत पदक विजेत्या ठरलेल्या तिन्ही अॅथलिट्स त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्या होत्या. त्यामुळं अथेन्स ऑलिम्पिकमधल्या महिलांच्या लांब उडीतल्या निकालाची चौकशी करण्याची मागणी आपण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय हौशी अॅथलेटिक्स फेडरेशनकडे करणार असल्याचं अंजूनं सांगितलं.