Breaking News

लातुरात उभारली ’पर्यावरण रक्षण अन् स्वच्छतेची गुढी’

लातूर (प्रतिनिधी), दि. 29 -  गुढी पाडव्याचे औचित्य साधून लातुरात वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेची गुढी उभारण्यात आली. या कार्यक्रमास लातुरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेची शपथ लातूरकरांनी घेतली. 
राजीव गांधी चौकात ही 21 फुटांची गुढी उभारण्यात आली. या कार्यक्रमास अँड. बळवंत जाधव, अँड. आण्णाराव पाटील, मकरंद सावे, रविशंकर जाधव, शिवकुमार वाले, श्रीकांत रांजणकर, प्रा. रंजीत जाधव, अँड. गणेश गोमचाळे, भास्कर औताडे, अँड. अजित चिखलीकर, हातिम शेख, प्रा. अनीता चिखलीकर, अलका शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी वसुंधरा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे होते. मान्यवरांच्या हस्ते गुढीचे आणि वृक्षाचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली. यात चिमुकल्यानी ’पर्यावरण रक्षण आणि स्वच्छ लातूर सुंदर लातूर’ संदर्भात जनजागृती करणारे फलक हातात घेऊन या विषयी जनजागृती केली. उपस्थितांचा वृक्ष आणि ग्रंथ भेट देऊन वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक सहसचिव अमर साखरे यांनी करून प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा मांडला. याप्रसंगी बोलताना आण्णाराव पाटील यांनी वसुंधरा प्रतिष्ठानने सुरु केलेली चळवळ आदर्श असून यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अँड. बळवंत जाधव यांनी निसर्ग रक्षण ही काळाची गरज असून भावी पिढी सुरक्षित राहावी यासाठी आजच वृक्ष लागवड आणि संगोपन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन प्रशांत सातपुते यांनी तर आभार श्रीकांत क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे अमर साखरे, गणेश कुंभार, उमाकांत क्षीरसागर, नागेश जाधव, विशाल शिंदे, धनराज कोंबडे, अजय साठे, उमेश मुंडलिक, रामदास घार, दीपक लांडगे, नागनाथ भंडारकोटे, वैभव गडकरी, प्रा. दगडू शेख, राम बोडके, उमाकांत मुस्तापुरे, प्रतिक तेलंग, सौ. रासुरे, येलनारे, आशा आयाचित, रेणुका बोरा, सुष्मिता बोरा, ऐश्‍वर्या बोरा आदीनी परिश्रम घेतले.