काँग्रेस मालकी संस्कृतीला जागा दाखवा - पालकमंत्री निलंगेकर
लातूर (प्रतिनिधी), दि. 30 - गत 35 वर्ष काँग्रेसचे लोकप्रतिनिधींना काम करण्याचे स्वातंत्र्य काँग्रेस नेतृत्वाने दिलेच नव्हते. काँग्रेस मध्ये मालकी संस्कृती असून केवळ रबरस्टँम्प म्हणून त्यांच्या नगरसेवकांना काम करता आलेले होते. त्यामुळेच लातूर मध्ये लोकशाहीच्या मुल्यांना पायदळी तुडविण्याचे काम काँग्रेसच्या मालकी संस्कृतीने केले असून जिल्हयात खर्या अर्थाने भाजपाने लोकशाहीला रुजविण्यास प्रारंभ केला आहे. हि लोकशाही लातूर मनपात राबवून जलयुक्त लातूर साठी भाजपाला मनपा निवडणूकीत लातूरकरांनी संधी द्यावी असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
लातूर मनपाच्या निवडणूक प्रचारार्थ शहरातील पंचशिल नगर येथे जाहिर सभेत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जि.प.अध्यक्ष मिलिंद लातूर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अख्तर मिस्त्री, अप्पा मुंडे, मोहन माने, सुधीर धुत्तेकर, सुशिल कांबळे आदिंची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेनुसार लोकशाही स्थापन केलेली होती. लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालविलेले सरकार म्हणजेच लोकशाही होय मात्र गेली 35 वर्ष लातूर मनपात सत्ता उपभोगणार्या काँग्रेसच्या नेतृत्वाने या लोकशाहीची सर्व मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम केले असल्याचा आरोप करत पालकमंत्री निलंगेकरांनी काँग्रेसच्या या संस्कृतीमुळेच लातूरची बदनामी अवघ्या जगभरात झाली असल्याचे सांगून आता सर्वसामान्यांच्या प्रश्नाला व मदतीला धावून जाणार्या भाजपाच्या जनसेवकांना लातूरकरांनी साथ द्यावी. असे सांगून गत 35 वर्षाच्या कारभारात काँग्रेसच्या नगरसेवकांना केवळ रबरस्टॅॅम्प म्हणून वापरणार्या काँग्रेस नेतृत्वाने लातूरचा केवळ आभासी विकास केला असल्याचे पालकमंत्री निलंगेकरांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील प्रत्येक गल्ली बोळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरी चालू असून हि दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही असा इशारा ही यावेळी पालकमंत्री निलंगेकरांनी दिला आहे. लोकशाहीची खर्या अर्थाने जोपासणा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून काँग्रेसच्या पंतप्रधानांनी केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण केले असल्याचे सांगितले. मात्र भारतीय संविधानाला ग्रंथ मानून काम करणार्या भाजपाच्या नेतृत्वामुळे अवघ्या देशभरात ‘सबका साथ सबका विकास ’होऊ लागला असल्याने परिवर्तनाची लाट पसरलेली असल्याचे पालकमंत्री निलंगेकरांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, सुधीर धुत्तेकर, सुशिल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मुंबई येथील इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळवून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांच्या वतीने पालकमंत्री निलंगेकरांचा भव्य सत्कार करुन ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले.