Breaking News

आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी उषाताई वाघमारे

लातूर (प्रतिनिधी), दि. 26 - प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याच्या उद्देशाने शुक्रवार 24 रोजी  शाक्यमुणी बुध्द विहार सुभेदार रामजी नगर लातूर येथे ज्येष्ठ नागरिक गोरोबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यामध्ये सर्वानुमते जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सौ.उषाताई वाघमारे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष सुनील सुरवसे, सचिव प्रीतेश सुरवसे, सहसचिव सौ. जयश्रीताई वाघमारे, सौ. उषा कांबळे, कोषाध्यक्ष, अनिल राऊत, सौ.मुक्ताबाई भालेराव, संघटक गोदावरीबाई अजनीकर, बेबीताई ढाले, प्रतिज्ञा कांबळे, सहसंघटक सौ. शारदा गायकवाड, सौ.शोभा राऊत, स्वागताध्यक्ष सौ. कल्पना पंडित, सौ. मनिषा ससाणे, सांस्कृतिक प्रमुख सुशील सुर्यवंशी, कार्यवाहक वैजयंता दहीवाडे, सविता कोकाटे, कार्याध्यक्ष कलावती गायकवाड, प्रतिज्ञा कांबळे, मिरवणूक प्रमुख, प्रशांत सुर्यवंशी, उदय माने आदींची निवड केली, बैठकीसाठी परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते. बैठकीमध्ये उपस्थित नागरिक आणि पदाधिकार्‍यांकडून या उत्सवादरम्यान विविध स्वरूपाचे प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.