लातूरची सोयाबीन मालतरण योजना 1 मार्च पासून बंद होणार
लातूर (प्रतिनिधी), दि. 26 - लातूर बाजार समितीच्या वतीने सुरूकरण्यात आलेली सोयाबीन मालतारण योजना दि. 28 फेब्रुवारी 2017 हि अंतिम तारीख असून 1 मार्च 2017 पासून हि योजना बंद करण्यात येत असल्याची माहिती लातूर बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे . लातूर बाजारसमितीच्या वतीने शेतकरी बांधवासाठी 2003 साला पासून ही योजना सुरूकेली असून प्रति वर्षी या योजनेला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला
. काही कारणास्तव पणन मंडळा कडून हि योजना काही वर्षा पूर्वी सुरूहोऊ शकली नाही त्यावेळी लातूर बाजार समितीने स्वनिधीतून सुरु ठेवली सातत्याने हि योजना राबवल्याने लातूर बाजार समिती राज्यात दुसर्या क्रमांकावर आहे .
चालू वर्षी लातूर बाजार समिती मध्ये 284 शेतकर्यांनी20000 क्वी . सोयाबीन तारण ठेवले असून त्याना 3 कोटी 85 लाख रु . वितरित करण्यात आले आहे . तर मुरुड उपबाजारपेठेत 35 शेतकर्यांनी 2200 क्वी . सोयाबीन तारण ठेवले त्यापोटी 42 लाख रु.वाटप करण्यात आले . असून दि 28 फेबुवारी 2017 पासून ही योजना चालूवर्षा पूर्ती बंद करण्यात येणार असल्याने याची नोंद संबंधीत शेतकर्यांनी घ्यावी असे आवाहन सभापती ललितभाई शहा ,उपसभापती मनोज पाटील ,सचिव मधुकर गुंजकर यांनी केले आहे.