अंगनवाडी क्र.189 मध्ये सांस्कृतीक कार्यक्रम
बुलडाणा, दि. 26 - येथील अंगणवाडी क्र.189 मध्ये फेब्रुवारी रोजी सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला.
एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी सेवा योजना बुलडाणा अंतर्गत बालविकास अधिकारी चेके यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी क्र.189 सांस्कृतिक कार्यक्रममाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बालविकास अधिकारी चेके म्हणाले की बालकांच्या सुप्त गुणांना चालणा देण्यासाठी व आनंदायी वातावरणात शिक्षण मिळण्यासाठी अशा कार्यक्रमाची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे. यावेळी कु.सुरेखा जाधव डॉ.शाह जनाबाई पाखरे बिबेताई ईत्यादीनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बालकांना प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या साठी अंगणवाडी सेविका कु.मिना नेमाडे मदतनिस सौ.मनकणी अवसरमोल, आशा गुडदे सह सर्व सेविका सर्व मदतनिस यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन वंदना आराख तर आभार प्रदर्शन याश्मीन शाह यांनी केले. कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.