लोणार महोत्सवास आ.रायमूलकर यांच्या आमदार निधीतून 5 लाखाचे अर्थसहाय्य
बुलडाणा, दि. 26 - जागतीक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार येथे 3 ते 5 मार्च 2017 पर्यंत लोणार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान लोणार महोत्सवामध्ये लोककलावंत, वैज्ञानिक, इतिहास अभ्यासक याचा समावेश आहे.
या लोणार महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. लोणार महोत्सवाच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय रायमूलकर यांनी 24 फेब्रुवारी रोजी भेट दिली असता लोणार महोत्सवासाठी आमदार निधीतून 5 लाख रुपयांचा निधी लोणार तहसिल कार्यालयाचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांचे कडे सुपूर्द केले. या प्रसंगी शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदूकिशोर मापारी, कृउबास सभापती शिवपाटील तेजनकर, मा.सभापती विजय मापारी, शिवसेना शहर प्रमुख पांडूरंग सरकटे, नवनिर्वाचीत जि.प.सदस्य भगवानराव कोकाटे, शिवशंकर डोळे, डॉ.अनिल मापारी, संतोष मापारी संचालक कृउबास, तेजराव घायाळे, संचालक कृउबास लोणार. तसेच लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊसाहेब सातपूते व कर्मचारी उपस्थित होते.