युरो किड्स स्कुलमध्ये स्पोर्ट डे साजरा
बुलडाणा, दि. 26 - युरो किड्स स्कुल चिखली येथे 23 फेब्रुवारी रोजी स्पोर्ट डे चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेतील शिक्षीकांनी विविध खेळांचे आयोजन केले होते. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शाळेच्या अध्यक्षा सौ.भारतीताई बांद्रे व शाळेचे मुख्याध्यांपक सुनिल अवसरमल यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षीका सौ.स्मीता ढवळे, सौ.माधूरी शिंगणे, कु.जया नागवा, श्री शंतनू ढवळे, सौ.रोहिणी वाजगे, सौ.संगिता जाधव, यांनी परिश्रम घेतले.