Breaking News

संभाजी ब्रिगेड शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल ः अमोल मिटकरी


बुलडाणा, दि. 16 - जगाचा पोशिंदा आत्महत्या करित आहे. राज्यकर्ते केवळ शोषक बनले आहे. राज्यकर्त्यांचा नाकारर्तेपणा आता अघड झाल्याने संभाजी ब्रिगेड  शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावुन लढण्यासाठी सज्ज असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिली. येथील सावित्री-जिजाऊ  दशरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड हे होते. 
यावेळी पुढे बोलताना प्रा. मिटकरी म्हणाले की, शेतकर्‍याच्या शेतमालाला हमी भाव व दारूमुक्त गाव हा अजेंडा घेवून संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली  आहे. शेतकर्‍यांची शासनाकडून होणारी कुचंबणा आता खपवून घेतली जाणार नाही. शिवरायांचा आशिर्वाद घेवुन सत्तेत आलेले हे सरकार आता शिवरायांच्या  आशिर्वादाला विसरु लागले आहे. नोट बंदीचा निर्णय अविचारी असल्याचा आरोप त्यांनी केला. लघुउद्योग, व्यावसायिक जनता या निर्णयामुळे वेठीस धरल्या गेली  आहे. भविष्यातही महापुरुषांची बदनामी संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. पुणे येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा  हटविणार्‍यांचे त्यांनी समर्थन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विकास पाटील तेजनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी रफिक कुरेशी, ज्ञानेश्‍वर  मानवतकर, जुगराज पठ्ठे, फिरोज शाह, विनोद झाल्टे, कैलास राऊत, उध्दव फंगाळ, सिध्देश्‍वर पवार, विवेक देशमुख यांच्यासह विद्युत डिपीसाठी आंदोलन  यशस्वी करणार्‍या सारंगधर शेतकरी मित्र मंडळाचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अविनाश देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी जगदिश एखांडे, प्रल्हाद  भिसे, प्रशांत इंगळे, अतुल शिंदे, गोलु मुळे, दत्ता इंगळे, देवा ढाकरके, संदिप कानोडजे, योगेश कानोडजे, योगेश शिंदे, संतोष नखाते, अतुल उगले, सागर वाठोरे,  सचिन उगले, सचिन भावसार, बबन सोळंके, लखन दुतोंडे, लखनसिंह यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अमित ससाणे यांनी केले.