Breaking News

माण तालुक्यात सीतामाई डोंगरावर महिलांची गर्दी

दहिवडी, दि. 16 (प्रतिनिधी) : कुळकजाई, ता. माण येथील सीतामाईच्या डोंगरावर सुवासिनींनी मकर संक्रातीनिमित्त सुवसिनीचा वाण लुटण्यासाठी गर्दी केली  होती. सीतामाईला वाण देण्यासाठी मंदिरात महिलांनी रांगा लावल्या होत्या. माण तालुक्यासह जिल्ह्यातून आलेल्या महिलांनी दर्शन घेतले. मंदिर परिसरात  दर्शनासाठी अर्धा किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
सीतामाईचा सुवसिनीचा अखंड वसा देण्या-घेण्यासाठी महिला झाडाखाली बसल्या. तर घरून आणलेल्या पुरणपोळीवर समूहाने बसून उपवास सोडला. प्रशासनाने  व देवस्थान कमिटीने महिलांची गैरसोय होवू नये म्हणून पिण्याचे पाणी, वाहनतळ, दर्शनबारी याची सुरळीत व्यवस्था केली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये  म्हणून दहिवडी, फलटण आगारातर्फे जादा बसेस सोडल्या होत्या.
उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वनवे, चंद्रकांत खाडे व  त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मकर संक्रांतीनिमित्त सीतामाईच्या डोंगरावर सुवासिनीचा वाण लुटण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.