Breaking News

राजे छत्रपती कला महाविद्यालयात रा.से.यो.शिबिराचे उद्घघाटन संपन्न

बुलडाणा, दि. 16 - दिनांक 12.01.2017 रोजी दत्तकग्राम माळविहीर येथे राजे छत्रपती महाविद्यालय बुलडाणाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबिराचे  उद्घघाटन संपन्न झाले. सर्व प्रथम कार्यक्रमाचे प्रस्थाविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.शाहेदा मुनाफ यांनी प्रस्तुत केले. या प्रसंगी श्री दयारामजी सोनुने गुरुजी  व उप सरपंच  श्री. मनोहर धोडके माळविहीर यांचे मार्गदर्शन लाभले. मान्यवरांनी स्वयंसेवकांना श्रमाचे  याचे महत्त्व व भावी जीवनात शिबीर संस्काराचे महत्त्व  पटून दिले व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्यात. त्या नंतर प्रा. शशिकांत शिरसाट यांनी मुलांना शिबिराबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक विजय  मोरे सरांनी उत्कृष्ठ असा आयोजन केला होता. या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ. गरुढे सर, श्री. प्रा. रिठे सर, प्रा. लहासे सर, प्रा.श्री. दांडले सर, संध्याताई शिंदे,  प्रा. कामिनी मामर्डे मडम, श्री. गजानन मालठाणे, श्री. विष्णू उबाळे, तोटे भाऊ व रामेश्‍वर यांची सुद्धा उपस्थिती लाभली होती. तसेच सहकार्यक्रम अधिकारी डॉ.  नितीन जाधव यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभांगी व वैशाली यांनी केले.