Breaking News

अंगणवाडी सेविका, मदतनीस कामगार संघटनेची कार्यकारणी जाहीर

अहमदनगर, दि. 04 - महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संलग्न अंगणवाडी सेविका, मदतनीस कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रुपाली  जाधव यांची नियुक्ती करुन नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या कार्यालयात राज्याध्यक्ष एन.एम. पवळे व जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकित  अंगणवाडी सेविका, मदतनीस कामगार संघटनेची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी सुनिता देशमुख, जिल्हा सरचिटणीस शैलजा  उद्मले, कार्याध्यक्ष आशा दारकुंडे, उपाध्यक्ष बानू शेख, निता माने, सचिव विद्या दुसुंगे, खजिनदार संगीता डोंगरे, सह सचिव सुनंदा साळुंके, सुंदर धावडे यांची  नियुक्ती करण्यात आली.
एन.एम. पवळे म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून प्रश्‍न सुटत असतात. चांगले काम करणार्यांवर आरोप करण्याचे कारस्थान विरोधाकांकडून चालूच असते.  केलेल्या आरोपाने खचून न जाता त्याला सक्षमपणे तोंड देण्याचे सांगून, संघटनेचे उत्कृष्टपणे काम करण्याचे त्यांनी आवाहन केले.
के.के. जाधव म्हणाले की, सदर संघटना शासनाची मान्यताप्राप्त असल्याने नियमावली नुसार कामकाज चालू असते. संघटनेचे काम आर्थिक सक्षमतेवर चालत  नसून, संवेदनशील विचाराने चालू असते. मुलगी वाचवाचे धोरण शासन जाहिर करत असले तरी महिलांना अनेक ठिकाणी डावलले जात असल्याची खंत व्यक्त  करुन, अंगणवाडी सेविका व मदतनीस कामगारांच्या प्रश्‍नासाठी शासनस्तरावर संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. बैठकिसाठी सुरेश  पिंपळे, माजी सहा. उपायुक्त संजीव परशरामी, गुलाबराव जावळे, दिलीप उद्मले, रंगनाथ गावडे, बाळासाहेब पातारे, प्रविण घायतडक अशोक कालापहाड आदिसह  संघटनेच्या कार्यकारणी सदस्यापुजा जाधव, वर्षा वाघमारे, पुष्पा मोढवे, जयश्री जाधव, सौ.बनसोडे, श्रीमती वारुळताई, संध्या पाखरे उपस्थित होत्या.  नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्ती पत्र देवून राज्याध्यक्ष पवळे व जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तालुका कार्यकारणी नियुक्त  करण्याचे अधिकार नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांना देण्यात आले.