Breaking News

दाऊदला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू : राजनाथ सिंग

नवी दिल्ली, दि. 04 - कुख्यात गुन्हेगार  दाऊद इब्राहिम याला पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.  दाऊद हा अनेक वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला असल्याची चर्चा आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर पाकिस्तानने दाऊदला भारताकडे सोपवावे, यासाठी भारत सतत पाठपुरावा करत आहे. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट संघटनेनेदेखील दाऊद पाकिस्तानात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.