Breaking News

सातारा विभागातील हजार गावे विमाग्राम करणार : गडपायले

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : एलआयसीच्या सातारा विभागाने सामाजिक बांधिलकी म्हणून यावर्षी सातारा व सांगली जिल्ह्यातील एक हजार गावे विमाग्राम  करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सातारा सातारा विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक तुलशीदास गडपायले यांनी पत्रकार  परिषदेत सांगितले.  
येथील विभागीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गडपायले बोलत होते. याप्रसंगी विक्रय प्रबंधक पवन बर्णवाल, विपनन प्रबंधक उत्पल तडफदार  यांच्यासह एलआयसीच्या सातारा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गडपायले म्हणाले, सातारा विभागाने या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 65 हजार पॉलिसीसह 148 कोटी रुपये पहिला हप्त करून हप्त्यामध्ये 31 टक्के वाढ दर्शविली  आहे. यावर्षी एलआयसी डायमंड ज्युबली वर्ष साजरे करत असून या निमित्त बिमा डायमंड नावाने विमा योजना ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे. जीवन  लाभ ही विमा योजना सर्वांना लाभदायक असून घटत्या व्याजदराच्या काळामध्ये जीवन अक्षय सारखी योजना आजही 6.90 टक्के व्याजदराने परतावा देते. या  डायमंड ज्युबली वर्षात एलआयसीने आपल्या सर्व विमाधारकांना विशेष बोनस जाहीर केला असल्याचे सांगून ते म्हणाले, एलआयसीच्या सातारा विभागाने  सामाजिक बांधिलकी म्हणून आपले योगदान विविध क्षेत्रांत दिले आहे. यावर्षी सातारा विभागाने एक हजार गावे विमाग्राम करण्याचे बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  ज्यामध्ये या गावांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते. यामाध्यमातून विविध विकासकामे करता येतात. सातारा-सांगली जिल्ह्यातील 1325 गावांतून  कमीत-कमी 100 पॉलिसी आणि 10 लाख रुपयांचा प्रिमीयम केला की ते गाव विमाग्राम पुरस्कारासाठी प्राप्त ठरणार आहे. यानंतर त्या गावाला तत्काळ एक लाख  रुपयांचा निधी एलआयसीकडून देण्यात येणार आहे. या निधीतून शाळाची खोली, पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप, सोलर पंप अशा विकासकामासाठी हा निधी  वापरता येईल.