Breaking News

काँग्रेस कार्यकर्त्यांनो निष्ठेने कामाला लागा ः आ. कदम

सांगली, दि. 04 - कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हेवेदेवे विसरून कामाला लागा असे आवाहन सांगली, सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार मोहनशेठ कदम  यांनी जत तालुक्यातील वळसंग येथील उद्योगपती सतीश चव्हाण यांच्या व वळसंग ग्रामस्थांच्या वतीने आमदार मोहनशेठ कदम यांचा नागरी सत्कार व आयोजित  केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, जि.म.बँकेचे संचालक विक्रम दादा सावंत, सभापती प्रशांत शेजाळ,  उपसभापती रामगोंडा संती, पी.एम.पाटील, कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळकृष्ण यादव आकाराम मासाळ, संतोष पाटील, आप्पाराया बिराजदार, डॉ कस्तुरे, बाबासाहेब  कोडग, पिराप्पा माळी, महादे़व साळुंखे, मारूती ठवरे, अ‍ॅड. युवराज निकम, नाना शिंदे, परशुराम मोरे, निलेश बामणे, जालिंदर व्हनमाने, संतोष भोसले, अविनाश  पोरे, शिवाजी अवटे, महादेव अंकलगी, योगेश व्हनमाने, रमेश पाटील, अ‍ॅड. रमेश शिंदे, संतोष बिराजदार, अनिल पाटील, बंडू शेख, अतुल मोरे, बापू चव्हाण,  शंकर टिळे, विजय बिराजदार, महिबुब काकतीकर, कृष्णा टिळे, बाळू पाटील यांच्यासह कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. मोहनशेठ कदम  म्हणाले की, पक्षनिष्ठा ही महतवाची असून 1978 साली कॉग्रेस पक्षातून मी एकमेव जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो 23 वर्षांनी मला जि.प.अध्यक्षपद  मिळाले व 45 वर्षांनी मला आमदारकी मिळाली असून मी पक्षावर ठेवलेल्या निष्टेमुळे हे पद मला मिळाले आहे. जिल्ह्यात कार्यकर्त्यांची कामे करायची असेल तर  जि.प.व पं.स. हे महत्वाची संस्था असून यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्‍न सोडविण्यास मदत होते. जिल्हा भरात कॉग्रेसमध्ये अनेकजण प्रवेश  करण्यास सुरूवात केली आहे. येणार्‍या जि.प., पं.स.निवडणूकीत सर्वांनी मिळून एकत्र बसून उमेदवारी ठरवूया चांगल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचे काम कॉग्रेस  पक्ष करणार आहे. यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गटतट विसरून कामाला लागा असे आवाहन मोहनशेठ कदम यांनी केले.
उद्योगपती सतीश चव्हाण सारखे माणसे आज कॉग्रेस पक्षात येत आहेत याचा फायदा कॉग्रेस पक्षाला नक्कीच होईल असे मोहनशेठ कदम म्हणाले यावेळी बोलताना  उद्योगपती सतीश चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने देशाचे वाटोळे केले असून कॉग्रेस पक्षाने ज्या योजना आल्या होत्या त्या आज भाजप सरकार नाव बदलून  मार्केटींग करत आहेत. कॉग्रेस पक्षाने जे कार्यकेले आहे. भारतातील नागरीक याचे उपकार कधीच विसरणार नाहीत. भाजप पक्ष हा शेडजी, भडजींचा पक्ष असून  जत तालुक्यातील नेते हे स्वार्थी वृत्तीचे असून स्वतः कमवून व पक्ष सोडून गेले आहेत. सहकारी संस्था वाटोळे करण्याचे काम या तालुक्यातील नेत्यांनी केले आहे.  जत तालुक्यात रोजगार निर्मिती झाली नाही.
विक्रमदादा सारखा चांगला माणूस राजकारणात आले असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू येणार्या जि.प. व पं.स.निवडणूकीत कॉग्रेस पक्षाची ताकद दाखवून  देऊ असे सतीश चव्हाण म्हणाले यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पी.एम.पाटील जेष्ठ नेते बाळाकृष्ण यादव आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत उपसरपंच मनिष  चव्हाण यांनी केले. आभार राजेंद्र माने यांनी मानले. यावेळी वळसंग ग्रामस्थांच्या वतीने आ. मोहनशेठ कदम यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.