Breaking News

सातारा जिल्हा परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने  सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जास्तीत जास्त घरकूल देऊन  उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल.  थाडे यांचा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविले.
राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई, शबरी, पारधी या घरकूल योजनांत सन 2016 व 17 मध्ये सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने  सर्वोत्कृष्ट कामकाज केले. सुमारे 476 लाभार्थ्यांना थेट बँकेत घरकूल अनुदानाचा पहिला हप्ता मुख्यमंत्र्याच्या हस्ते एफटीओद्वारे जमा करण्यात आला. राज्य  शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने खारघर नवी मुंबई येथील ग्रामविकास भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान गौरविण्यात आले.
 मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा  ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ना. प्रकाश मेहता, आ. प्रशांत ठाकूर, आ. मंदा म्हात्रे,  माजी खासदार रामशेठ ठाकूर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सिडकोचे भूषण गगराणी, जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवी साळुंखे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सुनील चतुर,  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या यशात जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास  अधिकारी, बँका, क्लार्क, ग्रामसेवक, डाटा एंन्ट्री ऑपरेटर, अभियंते यांचे योगदान महत्वपुर्ण असल्याचे समाजकल्याणचे उपायुक्त एन. एल.थाडे यांनी सांगितले.