योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन
औरंगाबाद, दि. 02 - सर्वसामान्य तसेच शेतकर्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. चापानेर व चिंचखेडा गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन व चापानेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण श्री बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, माजी आमदार नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, माजी महापौर भागवत कराड, जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पा पवार, काकासाहेब तायडे, , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, तहसिलदार विनोद गुंडमवार,आदींची उपस्थिती होती.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष श्री बागडे म्हणाले की, राज्यात पाण्याचे शाश्वत साठे निर्माण करण्यासाठी गत दोन वर्षापासून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान अत्यंत उपयुक्त ठरले आहे.