सर्व निवडणुका ताकदीनीशी लढवण्याचा संभाजी ब्रिगेडचा निर्धार
नांदेड, दि. 02 - शंभर टक्के समाजकारण व शंभर टक्के राजकार हे सूत्र घेऊन संभाजी ब्रिगेडने राजकीय प्रवासाला सुरूवात केली असून या पुढील काळात येणा-या सर्व निवडणुका ताकदीनीशी लढवण्याचा निर्धार केला असून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक सुधीरभाऊ देशमुख यांनी नांदेड येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील दहशतवादाचे उच्चाटन करून समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता ही संविधानिक मूल्ये रूजविण्यासाठी काम करीत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी 107 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. प्रास्ताविक संकेत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दशरथ कदम यांनी केले.