बालाघाट परिसरातील विकास कामांना सुरूवात
बीड, दि. 02 - पंकजाताई मुंडे यांच्या निधीतून बालाघाटाचा रखडलेला विकास आता होण्यास सुरुवात झाली असून या भागातील विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असुन बुधवार दि.4 जानेवारी 2017 रोजी बालाघाटाच्या विकास पर्वाचा प्रारंभ मंत्री पंकजाताई यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करून होणार असल्याचे माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली.
बालाघाटाचा परिसर हा गोर-गरीब शेतकरी, शेत मजुरांचा परिसर आहे. बुधवार, 4 जानेवारी रोजी बालाघाटाच्या विकास पर्वाचा प्रारंभ ना.पंकजाताई यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करून होणार आहे. या भुमीपुजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केज मतदार संघाच्या आ.संगिताताई ठोंबरे असणार असुन आ.आर.टी.देशमुख, आ.अॅड.लक्ष्मण पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तांदळवाडी घाट - सफेपुर- पोथारा - खंडाळा-आंबीलवडगाव येथे सोलार पथदिवे कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे दिली आहे.