प्रो रेसलिंग लीग : राहुल आवारेने संदीप तोमरला लोळवलं
नवी दिल्ली, दि. 03 - महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेने रिओ ऑलिम्पिकसाठीच्या निवडीत त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब आज चुकता केला. प्रो रेसलिंग लीगमधल्या 57 किलोच्या लढतीत राहुलनं त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी संदीप तोमरचा 14-5 असा तब्बल नऊ गुणांनी पराभव केला.
लढतीच्या पहिल्या राऊंडमध्ये संदीपने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण दुसर्या राऊंडमध्ये राहुलनं आक्रमक खेळ करून 14 गुणांची घसघशीत कमाई केली. हीच कमाई राहुलला तांत्रिकदृष्ट्या निर्विवाद विजय देणारी ठरली. रिओ ऑलिम्पिकमधल्या 57 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्त्व कुणी करायचं यासाठी चुरस होती. पण भारतीय कुस्ती महासंघानं त्या वेळी निवड चाचणी न घेताच संदीप तोमरला रिओचं तिकीट दिलं होतं. भारतीय महासंघाकडून झालेल्या त्याच अन्यायाचा हिशेब, राहुलनं संदीपला हरवून चुकता केला.