अक्षय कुमार, सलमान, करण जोहरचा लवकरच नवा सिनेमा!
मुंबई, दि. 03 - बॉलिवूडचे दोन सर्वात मोठे स्टार सलमान खान आणि करण जोहर दोघेही त्यांच्या सहनिर्मितीतला पहिला सिनेमा लवकरच अक्षय कुमारसोबत करणार आहेत. करण जोहरने वर्षाच्या सुरुवातीला ही बातमी दिली आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत असेल. तर दिग्दर्शन अनुराग सिंह करणार असून हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज होईल. करण जोहरने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
सलमान आणि अक्षय कुमार दोघांनीही या सिनेमाबाबत मोठी उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे. मात्र सलमानच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी अशी की, या सिनेमात तो केवळ सहनिर्माता असून कोणत्याही भूमिकेत नसेल.
सलमान आणि अक्षय कुमार दोघांनीही या सिनेमाबाबत मोठी उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे. मात्र सलमानच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी अशी की, या सिनेमात तो केवळ सहनिर्माता असून कोणत्याही भूमिकेत नसेल.