सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य : अनुराग ठाकूर
नवी दिल्ली, दि. 03 - बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन सुप्रीम कोर्टाने हटवल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी आपल्याला कोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलंय. कोर्टाने जो निर्णय घेतला तो आपण आदरपूर्वक स्वीकारतो, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
लोढा समितीने बीसीसीयमधील मोठ्या विकेट्स घेतल्या आहे. सुप्रीम कोर्टाने अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटवलं आहे. याशिवाय बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनाही आऊट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात दोघांनाही अपयश आल्याने न्यायमूर्तींनी दोघांवर ताशेरे ओढले आहेत. तसंच खोटी साक्ष दिल्याप्रकरणी अनुराग ठाकूर यांच्यावर अवमानाचा खटलाही चालणार आहे.