Breaking News

धिंगाणा घालणार्‍या त्या दोन पोलीसांचा अहवाल मागवला

सांगली, दि. 04 - मद्य प्रशान करुन ढाब्यावर धिंगाना घालणार्‍या त्या दोन पोलीस अधिकार्‍यांचा अहवाल पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मागविला  असल्याचे समजते. सांगली शहरातील दोन मोठ्या पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणार्‍या दोन अधिकार्‍यांनी  गुरुवारी बुधगाव येथील ढाबा व कॉलेज कॉर्नरवरील ज्युसच्या गाड्यावर थर्टी फर्स्टच्या आधीच धिंगाना घालता होता. मात्र त्या दोघांना किरकोळ समज देऊन  सोडण्यात आले होते. 
धिंगाणा घातलेला सहाय्यक पोलीस निरीक्षकाची सहा महिन्यापूर्वीच सांगलीत शहरातील एका पोलीस ठाण्यात बदली झाली. तर उपनिरीक्षक यापूर्वी शहर पोलीस  ठाण्यात कार्यरत होता. या दोन अधिकार्‍यांची जोडी अगदी जय-विरू सारखी आहे. सांगलीत भेट झाल्यानंतर त्या दोन अधिकार्‍यांच्यामधील दोस्ताना फारच  उफाळून आला. थर्टी फर्स्ट पूर्वीच पार्टी करण्यासाठी ते सांगली-बुधगाव रस्त्यावरील एका ढाब्यावर गेले. ढाब्यावर बसून त्यांनी दारु ढोसली. दारुची झिंग  चढल्यावर त्यांच्यातील पोलीस अधिकारी जागे झाले. त्यांनी ढाबा मालक व कमचार्‍यांना खाकीची भिती घालण्यास सुरवात केली. पोलीस अधिकारी असल्याचे  सांगत ढाबा कायमचा बंद करु अशी तंबी दिली. ढाब्यावर धिंगाणा घालून यथेच्छ जेवल्यानंतर दोघे मोटारसायकवरुन सांगलीत कॉजेल कॉर्नर येथे आले. तिथे  एका हातगाडीवाल्याबरोबर त्यांचा पुन्हा वाद झाला. वाद वाढत गेल्याने त्या उपनिरीक्षकाने कमरेला असलेले पिस्तूल काढून तेथे दहशत माजविण्याचा प्रयत्न  केला.
या ठिकाणी दोघांचा बराच वेळ धिंगाणा सुरु होता. झिंगलेल्या अवस्थेत खाकीची अबङ्घू ते काढून घेत होते. या दोघांचा प्रताप त्यांच्या वरिष्ठांना कळताच त्यांनी  सहाय्यक पोलीस निरीक्षकावर किरकोळ कारवाई केली, तर उपनिरीक्षक मात्र कारवाई पासून चार हात लांबच होता. दरम्यान या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा  सुरु झाल्याने  पोलीस अधिक्षक शिंदे यांनी त्या दोन झिंग अधिकार्‍यांचा अहवाल त्यांच्या वरिष्ठांच्याकडून मागविल्याची चर्चा आहे. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांनी  वेळकाढू पणाचे धोरण स्विकारल्याने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.