Breaking News

आयसिस-तालिबानविरोधात 45 अफगाणी महिलांचा सशस्त्र लढा

काबुल, दि. 03 -अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील जावजान प्रांतात तालिबान आणि इस्लामिक स्टेट (आयसिस) या दोन दहशतवादी संघटनांविरोधात काही अफगाणी महिलांनी शस्त्र हाती घेतले आहेत. तालिबान आणि आयसिसने जगभरातील अनेक देशांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आयसिसने अनेक निरपराधांच्या क्रूररित्या हत्या केल्या. या दहशतवादी संघटनांविरोधात आता अफगाणी महिलांनीच लढा सुरु केला आहे.
अफागाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात दहशतवाद्यांचं जाळं पसरु नये म्हणून या महिलांनीच पुढाकार घेऊन एक संघटना तयार केली आहे. अफगाणिस्तानसह  जगभरातील लोकांनी या महिलांच्या धडासला सलाम केला आहे आणि त्यांच्या लढ्यासाठी प्रोत्साहनही दिलं आहे. दहशतवाद्यांविरोधात शस्त्र हाती घेणार्‍या या  महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, महिलांच्या हातात असॉल्ट रायफल्स दिसत आहेत.