सातारा बाजार समितीच्या उपसभापतीपदी नितीन कणसे
सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अंगापूर येथील नितीन कणसे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कणसे यांचे अभिनंदन केले असून बाजार समितीच्या माध्यामातून शेतकर्यांची उन्नती साधावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
उपसभापती निवडीनंतर नितीन कणसे व त्यांच्या समर्थकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सतीश चव्हाण, सदस्य राजू भोसले, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे यांच्यासह वसंत कणसे, दिनकर कणसे, हणमंत कणसे, संदीप कणसे, बाळकृष्ण, कणसे, प्रदीप कणसे, शिवाजीराव कणसे, पांडुरंग कणसे, शंकर कणसे, किसन कणसे, राजेंद्र कणसे, विष्णू कणसे, महादेव कणसे, दिनकर भुजबळ, राजेंद्र शेळके, बजरंग जाधव, हिरालाल भोसले, शैलेंद्र आवळे, रमेश चव्हाण, दत्ता शिंदे, अशोक उंबरे, सुनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बाजार समित्या शेतकर्यांच्या आर्थिक सुबत्तेचा पाया आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मालाला चागंला भाव मिळवून देणे, शेतकर्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, हे बाजार समितीचे प्रमुख काम आहे. सातारा बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अनेक योजना सातत्याने राबवल्या गेल्या असून या योजनांमुळे बाजार समिती ही आपली हक्काची आहे, अशी भावना तालुक्यातील शेतकर्यांच्या मनात निर्माण झाली आहे. शेतकर्यांच्या पाल्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका, शेतकर्यांना 5 रुपयांत जेवण, पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह हे उल्लेखनीय उपक्रम बाजार समितीच्या माध्यमातून राबवले गेले आहेत. असे उपक्रम राबवून शेतकर्यांची उन्नती साधण्यासाठी प्रयत्न करा. पदाच्या माध्यमातून त्या पदाला साजेशे काम झाले पाहिजे. पदाच्या माध्यमातून काम करताना शेतकर्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घ्यावेत. सर्व पदाधिकार्यांनी एकदिलाने बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांची उन्नती साधावी, असे आवाहन आ. भोसले यांनी यावेळी केले.