राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी विशाल मोरे
कराड, दि. 01 (प्रतिनिधी) : ढेबेवाडी युवा नेते सत्यजीत पाटणकर, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय देसाई यांचे समर्थक विशाल मोरे (साईगडे, ता. पाटण) यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाटण तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली. राज्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम काळे-पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच्या निवडीबद्दल माजी आ. विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनिल माने, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय देसाई, युवा नेते सत्यजीत पाटणकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम काळे-पाटील, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल शिंदे व साईगडे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.