Breaking News

नोटाबंदीमुळे विकासाची गती मंदावेल !




राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांनी केली चिंता व्यक्त
नवी दिल्ली,दि.6 : नोटबंदीमुळे विकासाचा रथ मंदावेल, अशी चिंता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. पण नोटाबंदीमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरु असल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी मोदी सरकारला दिले आहे.

 नोटबंदीच्या निर्णयावर राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. नोटाबंदीमुळे विकासाची गती मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला तात्पुरती मरगळ येऊ शकते. पण भ्रष्टाचार आणि काळ्या पैसेवाल्यांधातल्या लढाईला बळ मिळेल, अशी चिंता राष्ट्रपती यांनी  व्यक्त केली. नोटाबंदीमुळे गरिबांना त्रास होतो आहे. गरिबांना त्रास होऊ नये यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. भविष्यात नोटबंदीचा गरिबांना फायदा होईल.

पण ते तोपर्यंत कळ काढू शकणार नाहीत, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.