ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन
मुंबई,दि.6 : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओम पुरी ओळखले जायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीसोबत त्यांच्या
चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ओम पुरी यांचे सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.