श्रीलंकेच्या नौदलाकडून 10 मच्छिमारांना अटक
रामेश्वर,दि.6 : श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूच्या 10 मच्छिमारांना अटक करून त्यांच्या नौकाही जप्त केल्या आहेत.श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी करताना या मच्छिमारांना अटक करण्यात आली. पुडुकोट्टई जिल्ह्यातील जगतपट्टनमचे काही मच्छिमार काल रात्री नेदुनतीवूमध्ये मासेमारी करत होते, याचवेळी त्यांना अटक करून
कानकेसंतुरई येथे नेण्यात आले, अशी माहिती पुडुकोट्टई मत्स्य विभागाचे सहाय्यक संचालक सेकर यांनी दिली.