Breaking News

भ्रष्टाचार निर्मूलनात सरकारी अधिकार्‍यांची भूमिका महत्त्वाची ः अशोक कामत

पुणे, दि. 17 - समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी सरकारी अधिकार्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.
बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे संस्थापक सचिव असलेले शंकर थत्ते यांच्या ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ प्रकाशित ‘जीवन-बोध कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. अशोक कामत पुढे बोलताना म्हणाले की, भ्रष्टाचार निर्मूलनात सरकारी अधिकार्‍यांप्रमाणेच सामान्य माणसाची जबाबदारीही खूप महत्त्वाची आहे. स्वच्छ अधिकार्‍यांच्या पाठिशी समाजाने उभे राहिले पाहिजे. थत्ते यांनीही आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणाने केली आहे. ती करताना कोणत्याही तडजोडी कधीही केल्या नाहीत. यावेळी शंकर थत्ते, डॉ. न. म. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीलाधर वाबळे यांनी केले.