Breaking News

डिजिटल व्यवहारांशी टोल फ्री हेल्पलाईन

नवी दिल्ली,दि.6 : डिजिटल व्यवहारांशी संबंधित समस्या, अडचणी, प्रश्‍नांच्या समाधानासाठी केंद्र सरकारने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14444 सुरू केला आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाचे सचिव जे.एस. दीपक यांनी  दिली. 
या अंतर्गत ‘भीम’सह विविध डिजिटल व्यवहार, ई-वॉलेट्स, आधार कार्ड संलग्न भरणा प्रणाली व युएसएसडी आदींशी संबंधित समस्या, अडचणी सोडवण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही हेल्पलाईन सध्या उत्तर व पूर्व भारतात इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच देशाच्या उर्वरित भागांत विविध भाषांमध्ये सुरू करण्यात येईल. ही हेल्पलाईन दूरसंचार विभाग, माहिती-तंत्रज्ञान व उद्योगाशी संबंधित
नॅसकॉम कंपनी यांनी एकत्रित येऊन तयार केली आहे.