केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीतच !
निवडणूक आयोगाने विरोधीपक्षांची मागणी फेटाळली
नवी दिल्ली,दि.6 : पाच राज्यातील विधानसभा निवडणूका होईपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरण पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी गुरूवारी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन केली. मात्र विरोधकांची ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली.
निवडणुकीच्या काळात बजेट सादर केल्यास नागरिक आश्वासनांना भुलून सरकारला मत देतील अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर होण्याची अपेक्षा आहे. तर पाच राज्यातील निवडणूकांची प्रक्रिया 4 फेब्रवारीपासून सुरु होत आहे. केंद्रातील भाजप सरकार मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी अनेक योजना जाहिर करील. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असे मतविरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मांडले. विरोधि पक्षांच्या 11 सदस्यीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगातील अधिकार्यांची भेट घेत, केंद्र सरकारने 8 मार्चनंतर अर्थसंकल्प मांडावा आणि 31 मार्चपूर्वी तो मंजूर करून घ्यावा, असे निवडणूक आयोगाला विरोधीपक्षांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सरकार घटनात्मक कर्तव्ये
सरकार पार पाडीत असल्यामुळे हा मुद्दा अर्थहिन असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.