Breaking News

गुन्हे असलेल्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात !


नवी दिल्ली,दि.6 : पाच राज्यात विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले असून, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी 5 न्यायाधीशांची समिती स्थापन केली आहे. 

 गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या उमेदवारांना निवडणुकीसाठी उभे राहण्यास अपात्र  ठरवण्यात यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुढील महिन्यात 5 राज्यात विधानसभा निवडणुका सुरु होत आहे. अशावेळी सर्वोच्च न्यायालय यासंबंधी महत्तवपूर्ण निकाल देऊ शकतो. 4 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यात विधानसभा निवडणुका सुरु होत आहे. अशावेळी सुप्रीम कोर्टाचा निकालाने अनेक बाहुबलींना धक्का बसू शकतो. सुप्रीम कोर्टाने नूकताच निर्णय दिला आहे की, उमेदवाराला जाती, धर्म, भाषा, पंथ या आधारे मते मागता येणार नाहीत. असे करणे कायद्याने गुन्हा आहे. गुन्हा सिध्द झाल्यास उमेदवारांची निवडणुकही रद्द होऊ शकते.