खंडणीखोर परवडले पण पत्रकार नको!
दि. 05, डिसेंबर - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांची जबाबदारी असते. या जबाबदारीशी प्रामाणिक असणारी प्रसारमाध्यमे किती आहे हा खरेतर जनगणनेसारखा गहन विषय आहे. सध्याच्या व्यावसायिक स्पर्धेच्या जगात जीवघेण्या धावपळीत गरज अतिव महत्वाकांक्षेत परावर्तीत होऊ लागल्यानं जबाबदारीचे भान हळूहळू सुटत चालल्याचा निष्कर्ष काढला जातोय. बदलत्या काळाबरोबर प्रसारमाध्मांनीही बदलायला हवं हे मान्य असले तरी कर्तव्य विसरणे कितपत संयुक्तिक आहे हाही एक मुद्दा आहे.
आम्ही प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठमोठ्या विद्वानांना शिकविण्याचा प्रयत्न करतो आहोत असा अर्थ कुणी काढू नये ही नम्र विनंती करतानाच याच क्षेत्राचा एक घटक म्हणून थोरामोठ्यांनी या क्षेत्राचा पाया ठिसूळ होतांना दिसतो तेंव्हा होणार्या वेदना मात्र अस्वस्थ करून जातात म्हणून लहान तोंडी मोठा घास घेण्याची दुर्बुध्दी सुचली आणि नकळत हा विषय ‘दखलं’पात्र ठरला.
दि. 6 जानेवारी, पत्रकारसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस ज्यांनी मराठी पत्रकारितेला जन्माला घातले म्हणून आपण सारे माध्यमकर्मी पत्रकार दिन साजरा करतो. हा दिवस खरे तर ज्यांनी माध्यमक्षेत्राची उंची वाढविली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी...प्रत्यक्षात मात्र त्यांच्या कर्तृत्वावर पत्रकारीतेची झुल पांघरलेले लांडगे समाजात सावज शोधत शिकारीची संधी साधण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्याने पत्रकार दिनाची वर्गणी दिली नाही तर त्यांच्या नावाने बदनामीची कोल्हेकुई सुरू होते.
गावोगाव विविध संघटनांचे कुंकू बाळी लावून अशा टोळ्या पत्रकार दिन जवळ आला की मोठ्या रूबाबात जोमाने कामाला लागतात. एखाद्या अधिकार्याच्या कार्यालयात जातात. पत्रकार आणि पत्रकारदिनाचे गोडवे गाऊन अधिकार्यावर मोहीनी टाकण्याची धडपड करतात. बर्याचदा नको नंगटांशी पंगा म्हणून अधिकारी ऐपतीप्रमाणे झोळीत दान टाकतात. मात्र एखादा जाणकार अधिकारी अशा नंगचोट टोळ्यांचे कारनामे जाणून असतो. तो या टोळीच्या म्होरक्याच्या हातात शे-दोनशे टेकवतो आणि सन्मानाने रजा घेण्यास विनंती करतो. या टोळ्यामद्ये राजरोस पत्रकार म्हणून मिरविणार्या महानुभवांनी समाजाच्या हितासाठी पत्रकारितेचा किती वापर केला? समाज जाऊ द्या पत्रकारांच्या हिताचे किती काम केले. यावर संशोधन केले तर नक्कीच डॉक्टरेट मिळेल. विशेष म्हणजे या टोळीत अनेकांना प्रत्यक्ष पत्रकारितेचा दूरपर्यंत संबंध नसतो. केवळ संघटनेशी संबंध आहे, पदाधिकारी आहे म्हणून पत्रकारदिनाच्या निमित्ताने दुकानदारी केली जाते.
कदाचित हे सारे वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया ताणल्या जातील अनेकांना हा द्रोहही वाटू शकतो. नाईलाज आहे. आहे ते एकदम विदारक. समाज पत्रकारितेकडे आशेने पाहतो आहे. समाजात विशेषतः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात नागविले जाते. त्या अन्यायाविरूध्द ब्र शब्द तर सोडा एका ओळीची बातमी लिहिण्याची औकात नसलेले हे कथित पत्रकार समाजातील सराईत खंडणीखोरांपेक्षा तसूभरही मागे नाहीत आणि अशाच मंडळींच्या हातात पत्रकारांचे नेतृत्व गेल्यानंतर पत्रकार समाजाचे काय भलं होणार याचं विवंचनेत पत्रकारिता व्यासंग म्हणून जपलेले दिवंगत अश्रू ढाळत असतील. अर्थात अशा टोळ्यांचा अपवाद सोडला तर माध्यमक्षेत्रात अजूनही तत्वनिष्ठा जपणारे पत्रकार आहेत. यावर आम्हाला शंका नाही. मात्र मुठभर मंडळींचा प्रभाव टोळ्यांच्या कारस्थानाने झाकोळून गेल्याने व्यवस्था खंडणीखोर परवडला पण पत्रकार नको असे म्हणत असेल तर त्यात दोष कुणाचा.