Breaking News

उज्ज्वला योजना राबवण्यात उत्तर प्रदेश अव्वल

नवी दिल्ली, दि. 04 - प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत देशात उत्तरप्रदेशने आघाडी घेतली आहे. उज्जवला योजना अंतर्गत महिलांना सर्वाधिक गॅस कनेक्शन देण्यात उत्तर प्रदेश अव्वल असून, पश्‍चिम बंगाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक ए. के. वर्मा यांनी ही माहिती दिली.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 रोजी सुरु करण्यात आली. या अंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 46 लाख गरीब कुटुंबाना स्वस्त गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. तर पश्‍चिम बंगालमध्ये 19 लाख आणि मध्य प्रदेशमध्ये 17 लाख स्वस्त गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये 35 टक्के गॅस कनेक्शन अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वाटण्यात आले, अशी माहितीही वर्मा यांनी दिली. त्यामुळे या कुटुंबातील महिलांना आता चुल्हीपासून मुक्ती मिळून गॅस स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करता येत आहे.