Breaking News

एका चेंडूत 13 धावा, बिग बॅश लीगमध्ये अनोखा विक्रम!

सिडनी, दि. 03 - अ‍ॅडलेड स्ट्रायकर आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात खेळविण्यात आलेल्या बिग बॅशमधील सामन्यात होबार्ट हरिकेन्सचा सलामीवीर डी आर्की शॉर्टने एका  चेंडूवर तब्बल 13 धावा करुन एक अनोखा विक्रम केला आहे. सामन्यातील 11व्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडूही डी आर्कीनं सीमारेषेपार पाठवला. पण पंचानी हा चेंडू नो बॉल दिला. त्यामुळे एकाच चेंडूवर 13 धावा डी आर्कीच्या नावावर जमा झाल्या.
हरिकेन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि स्ट्रायकरला 143 धावांमध्येच रोखलं. स्ट्रायकरकडून सर्वाधिक ब्रॅड हॉजनं 45 चेंडूत 55 धावा  केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हरिकेन्सच्या सलामीवीर जोडीनं दणदणीत सुरुवात केली. सलामीवीर टीम पेन (41) आणि डी आर्की शॉर्टनं (60) केल्या.  दरम्यान, 8 गडी राखून हरिकेन्सनं शानदार विजय मिळवला.