Breaking News

आरबीआयचा पेटीएमला हिरवा कंदील

नवी दिल्ली, दि. 04 - नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारासाठी सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पेटीएममध्ये आता पेमेंट बँकसुद्ध सुरु होणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यासाठी पेटीएमला अधिकृत मंजूरी दिली असून, लवकरच पेमेट बँक तुमच्या पेटीएम अकाऊंटमध्ये सुरु होणार आहे. यासाठी पेटीएमच्या पेमेंट बँकेतील ग्राहकांचे खाते त्याच्या पेटीएम वॉलेटशी जोडण्यात येणार आहे, त्यातून 14.5 टक्क्याचे व्याज ग्राहकांना मिळणार आहे. वास्तविक, पेटीएमने गेल्याच वर्षी पेमेंट बँक सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र इतर कंपन्यांच्या सहकार्य करारामध्ये पेटीएमची ही सेवा सुरु होण्यास उशीर झाला. कॅशलेस व्यवहारासाठी आरबीआयकडून नुकतेच पेमेंट बँकेला मंजूरी दिल्याने ग्राहकांची मोठी सोय होणार आहे.