Breaking News

अ‍ॅड. यादवराव माने यांचे निधन

कराड, दि. 2 (प्रतिनिधी) : घोगाव, ता. कराड येथील विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमात महत्वपुर्ण योगदान देणारे व मुलूंड (मुंबई) येथील रहिवाशी अ‍ॅड.  यादवराव दौलती माने  उर्फ वाय.डी. माने(वय 77 वर्षे) यांचे शुक्रवारी निधन झाले. डॉ. अरुण माने यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन  मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे.
घोगाव, ता. कराड येथील सर्वसामान्य कुटूंबातील अ‍ॅड. यादवराव दौलती माने यांनी आपले कायदेविषयी शिक्षण पुर्ण केल्यानंतर मुंबई टेलिफोन निगममध्ये सेवा  केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी वकील केली. घोगाव येथील सामाजिक व सार्वजनिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. धरती घोगांवची या  पुस्तकाचे लेखन करुन त्यांनी घोगाव परिसरातील ऐतिहासिक ठेवा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेडकर चळवळीतील प्रा. डॉ. आर. डी. भंडारे यांचे विश्‍वासू  सहकारी होते. त्याचबरोबर माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे विश्‍वासू समर्थकही ते होते. घोगाव पंचक्रोशी पतपेढीचे ते संस्थापक अध्यक्ष 15 वर्षे,  मुलूंड (मुंबई) येथील तांबेनगरमधील नवअभय कॉ. हौसिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष 15 वर्षे, वरळी नाईट हायस्कूलचे 35 वर्षे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही ते  कार्यरत होते.