Breaking News

पेलिकन पार्कच्या जागेत सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडून मागणी

नाशिक, दि. 03 - राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी याना नविन नाशिक(सिडको) येथील पेलिकन पार्क च्या जागेत   सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे अशा मागणी चे निवेदन सादर करण्यात आले. 
यावेळी  नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे,राहुल मुसळे,बिपिन कटारे , युवती शहराध्यक्ष पल्लवी सोनवणे,प्रतिक सोनटक्के,राहुल अंबुरे,उमेश आवचार,विकी  चौरे,संतोष मंडलिक,आदि नविन नाशिक येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका  यांनी पेलिकन पार्क  येथे काही वर्षापुर्वी  एस.एल.वर्ल्ड च्या धर्तीवर पेलिकन पार्कची उभारणी केली होती.त्यामुळे शहरातील व परिसरातील समस्त नागरिकांनी महानगरपालिकेस  धन्यवाद दिले होते. परंतु अत्यंत अल्पवधीतच पेलिकन पार्क बंद पडले याचे कारण मात्र नागरिकांना कळले नाही.इतक्या थाटा माटात पेलिकन पार्कची उभारणी  केली परंतु पुढे का चालु शकले नाही ही खेदजनक बाब आहे.पेलिकन पार्क बंद होऊन बराच कालावधी लोटला आहे,दरम्यान च्या काळात सदर च्या जागेत  दुरुपयोग वाढला आहे.अनेक अनैतिक उद्योग सदरील ठिकाणी राजरोस पणे सुरु आहे,त्यामुळे परिसरातील नागरिकांना,महिलांना,युवतींना यांचा नेहमीच त्रास होत  आहे.
नविन नाशिक (सिडको) हा परिसर कामगार,श्रमकरी,कष्टकरी वर्गाचा परिसर आहे. पेलिकन पार्कची जागा आज रोजी कोणत्याही वापरात नाही तेव्हा
जनतेची व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की,वरील जागेत महिलांना शिकण्याची पहिली संधी उपलब्ध करुण देणारे क्रांतीसुर्य सामाजिक क्रांतीचे अग्रदुत  महात्मा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारुन त्याच ठिकाणी महिलांसाठी अभ्यासिका, वाचनालय, निराधार, गोरगरीब महिलांकरिता  वस्तीगृह आदी बाबी सदर ठिकाणी केल्यास परिसरातील जनता महाराष्ट्र शासनास महानगरपालिकेस धन्यवादच देईल असे म्हटले आहे.