Breaking News

रोटरी मिडटाऊनच्या वतीने पोलिओ बूथचे उदघाटन

लातूर, दि. 30 - रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने पोलिओ निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत यशवंत विद्यालय या ठिकाणी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो सुधीर लातुरे यांच्या हस्ते 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचे 2 थेंब देऊन उदघाटन करण्यात आले.यावेळी यशवंत विद्यालयातील छउउ व स्काऊट गाइडच्या मुलांनी प्रभात फेरी काढून घरोघर जाऊन लहान मुलांना पोलिओ साठी आवाहन करून पोलिओ बूथ पर्यंत आणण्याचे कार्य केले.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष रो उमाकांत मद्रेवार,रो महावीर काळे,रो रवि जोशी,रो कपिल डुमने,बूथ प्रमुख चाकोते श्रावण,दुरवे यांनी परिश्रम घेतले.
प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांना बक्षीस
लातूर तालुक्यातील खंडाळा येथील रवींद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनाचे औचित्यसाधून शाळेत घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रारंभी शाळेत ध्वजारोहण मधुकरराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आर. बी. जाधव होते. मंचावर माजी विद्यार्थी रणजित झाडके, अनिल पुरी, शाहीर नवनाथ पूरी आदींची उपस्थिती होती.
इयत्ता 10 वीमध्ये शिकणारी विद्यार्थिंनी नीता रामदास खुडेचा आदर्श विद्यार्थी म्हणून इंग्रजी शब्दकोश व शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2016 मधील खंडाळा गावातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा शाहीर नवनाथ दगडूबुवा पुरी यांच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी रणजित झाडके यांनी नामवंत लेखकांची पुस्तके फॅशन डे मधील विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. त्यांनी हुंडा या अनिष्ट प्रथेला विरोध करा व हुंडा घेणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. अनिल पुरी यांनी गावातील मातीचा गंध हा शहरातील गगनचुंबी इमारतींना येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामीण संस्कृतीचे जतन करावे, असे सांगून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक त्यांनी केले. प्रास्ताविक व्ही. बी. काळे यांनी केले. सूत्रसंचलन श्रीमती एन. एम. शिंदे यांनी केले. आभार ए. व्ही. पळकुटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जी. एच. धपाटे, एस. एस. कदम, टी. डी. कांबळे, डी. पी. ठोंबरे, व्ही. पी. काळे, बी. बी. शिंदे, श्रीमती के.एन. झाडके यांनी परिश्रम घेतले.