Breaking News

पिंपरी गावात नोकरी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. 02 - पिंपरी गावातील युवा उद्योजक संदीप वाघेरे युवा मंच व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नोकरी महोत्सवास उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील पन्नासहून अधिक नामवंत कंपन्या, बँकांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. साडेपाच हजारांहून  अधिक युवक युवतींनी या महोत्सवाचा लाभ घेतला. नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने युवकांनी समाधान व्यक्त केले.
पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालयात रविवारी (दि. 1 जानेवारी) सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळात आयोजित या नोकरी महोत्सवाचे उदघाटन  माऊली महाराज वाळुंजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युवा उद्योजक व भाजपचे कार्यकर्ते संदीप वाघेरे, माजी नगरसेवक संतोष कुदळे,  अंकुश कापसे, योगेश वाघेरे, गणेश कापसे, उमेश खंदारे, हरिष वाघेरे, नितीन गव्हाणे, रंजना जाधव, कुणाल सातव, अमित कुदळे, प्रतिभा बांगर, सोपान हुले,  सोनू कदम, अर्जुन देसले, प्रसन्न वाघोलीकर उपस्थित होते.
या नोकरी महोत्सवात टाटा मोटर्स, भारत फोर्ज, युरेका फोर्ब्स, महिंद्रा प्राईड, टाटा डोकोमो, आयडिया, आयसीआयसी बँक, आयडीबीआय बँक अशा 50 हुन  विविध आस्थापना, कंपन्या, बँका सहभागी झाल्या होत्या.
पदवीका, पदवी, पदव्युत्तर, आयटीआय, एमबीए तसेच पदवी परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसह कमी शिक्षण झालेल्या बेरोजगारांच्या तसेच अधिक चांगल्या संधीच्या  शोधातील युवक युवतींच्या मॅन्युफॅक्चरींग, फार्मसी, फायनान्स, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बँकींग, टेलिकॉम, आयटी आदी क्षेत्रातील कंपन्यांमधील उपलब्ध  जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.