चालत्या कारने घेतला अचानक पेट
पुणे, दि. 02 - जमीन पाहण्यासाठी मित्राला स्विफ्ट कारमध्ये बरोबर घेवून निघालेल्या कारने पाईट ( ता. खेड ) गावच्या हद्दीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने कार जाळून खाक झाल्याचा प्रकार घडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
गजानन रमेश शेरेकर ( वय 38 वर्ष, रा. अनुपम हौसिंग सोसायटी, जी. ब्लॉक आर.एच.4312, संभाजीनगर, चिंचवड ) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेरेकर हे गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या दरम्यान भोसरी येथून चाकण व शिरोली मार्गे कारमध्ये त्यांचा मित्र प्रवीण हनुमंत जाधव ( वय - 39 वर्ष, रा. शाहूनगर, चिंचवड, पुणे ) यांना बरोबर घेवून पाईट गावाकडे जात होते. जाण्यापूर्वी त्यांनी पाईट येथे थांबून नाश्टा केला. व त्यांनतर ते पाईट हून पुढे कुडे ( ता. खेड ) या गावी जात असताना गाडीतून धूर निघू लागल्याने गाडीचालक शेरेकर यांनी गाडी रस्त्यातून बाजूला घेवून ते जाधव यांच्यासह गाडीतून खाली उतरले.
तोपर्यंत गाडीच्या डेशबोर्डने पेट घेतला. क्षणार्धात गाडीच्या आतून आगीच्या मोठमोठ्या ज्वाला बाहेर आल्या. संपूर्ण गाडी जाळून खाक झाली.
आग कशाने लागली हे रात्री उशिरा पर्यंत समजले नसून, चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.