पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणार्या 771 जणांवर कारवाई
पुणे, दि. 02 - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी आखलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणार्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 771 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, ट्रिपल सीट प्रवास करणा-या 186 आणि वेगाचे उल्लंघन करणार्या 12 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत करताना अनेकजण हॉटेल, पब, ढाबे आदी ठिकाणी दारू पिऊन अतिवेगात रस्त्यावर वाहने चालवतात. मद्याच्या धुंदीत त्यांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. परिणामी, अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात; याला आळा बसावा, याकरिता वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांचे 28 विभाग आहेत. पोलिसांनी ‘ब्रेथ अॅनालायझर’ मशिनमार्फत मद्यपी चालकांची तपासणी केली. खडक 8, फरासखाना 7, विश्रामबाग 7, डेक्कन 14, शिवाजीनगर 10, कोथरुड 10, वारजे 35, समर्थ 7, लष्कर 10, स्वारगेट 17, दत्तवाडी 42, सहकारनगर 6, भारती विद्यापीठ 19, बंड गार्डन 12, कोरेगाव पार्क 30, खडकी 11, विश्रांतवाडी 67, येरवडा 22, हडपसर 26, वानवडी 20, कोंढवा 15, निगडी 16, पिंपरी 37, चिंचवड 11, भोसरी 14, चतु:श्रृंगी 14, सांगवी 20 आणि हिंजवडी परिसरात 66 अशा एकूण 771 तळीरामांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, ट्रिपल सीट प्रवास करणार्या 186 आणि वेगाचे उल्लंघन करणार्या 12 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौक, वाकड नाका, नाशिक फाटा, पिंपरी चौक, निगडीतील भक्ती-शक्ती चौक, केएसबी चौक, हिंजवडी, बाणेर सिटी अशा विविध 12 ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मद्यप्राशन करून वाहने चालविणार्या चालकांची ‘ब्रेथ अॅनालायझर’ मशिनमार्फत तपासणी करण्यात आली. शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यपी वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले.
परिमंडळ तीनच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील 90 टक्के अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात होते. महिलांची छेडछाड होऊ नये याकरिता सर्व ठाण्यातील महिला अधिकारी, कर्मचारी आणि तपास पथकातील कर्मचारी यांचे ’छेडछाड’ पथक तयार करण्यात आले होते. शहराच्या मुख्य ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. पिंपरी-चिंचवड शहरात कुठेही गोंधळ झाला नसल्याचे चतु:श्रृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव आणि पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांनी सांगितले.